बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली ही लोकांच्या मनातील भीतीची फायदा घेत हे औषध बाजारात आणले आहे. त्यामुळे लोकांना हे औषध कोरोनावरील औषध असल्याचे वाटतेय. खरं तर हे औषध फक्त ताप, सर्दी, खोकला यावरचे आहे. असे न्यायालयाने सांगत पतंजलीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चेन्नईतील अद्यार इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पतंजली विरोधात याचिका दाखल केली आहे. या कंपनीचा कोरोनील या नावाने ट्रेडमार्क 2027 सालापर्यंतसाठी रजिस्टर आहे. पतंजलीने या नावाने औषध बाजारात आणताना ते नाव रजिस्टर आहे की नाही हे तपासणे गरजेचे होते असे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने पतंजलीला कोरोनील हे नाव न वापरण्याचे आदेश दिले आहेत.