उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यापासून लोक ऑनलाईन दारू विकत घेऊ शकतील परंतू याचा लाभ काही भागांमध्ये मिळणार आहे. यात घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यासच ऑनलाइन दारू विक्री करणारा दारूचा पुरवठा करू शकणार आहे.
तसेच दुसरीकडे आसाम आणि मेघालय या दोन राज्यातील सरकारने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. 17 एप्रिलपासून हा निर्णय लागू असणार आहे. तर मेघालयमध्ये 9 ते 4 या वेळेत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्री करताना दुकानदारांनी कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टसिंगची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत.