भूस्खलनात ट्रकची धडक, 4 जणांचा मृत्यू

मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (11:13 IST)
Jammu Kashmir news : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे भूस्खलनामुळे ट्रक खोल दरीत कोसळला, त्यामुळे त्यात बसलेल्या 4 जणांचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास रामबन जिल्ह्यातील शेरबीबीजवळ महामार्गावर दरड कोसळल्यानंतर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता.
 
स्थानिक लोक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि ट्रकमध्ये अडकलेल्या चारही मृतदेहांना बाहेर काढले.
 
कुलगाम येथील ट्रक चालक मोहम्मद अफजल गरू (42), त्याचा भाऊ अल्ताफ गरू (36), अनंतनाग येथील इरफान अहमद (33) आणि त्याचा भाऊ शौकत अहमद (29) अशी मृतांची नावे आहेत. ट्रकमधून घरगुती वापरासाठी नेत असलेल्या सुमारे सहा गुरांचाही या अपघातात मृत्यू झाला.
 
दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारा हा एकमेव सर्व हवामान रस्ता आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती