महिलेने ऑटोरिक्षात दिला बाळाचा जन्म, शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास तीनदा नकार

गुरूवार, 30 एप्रिल 2020 (13:22 IST)
पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात तीन रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्यावर एका महिलेने ऑटोरिक्षामध्येच बाळाला जन्म दिला. नंतर तिला आणि नवजातला पोलिसांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
 
सरबनी सरदार असे या ३० वर्षीय महिलेचे नाव आहे. मंगळवारी तिच्या पोटात दुखू लागल्यावर पती प्रीतम यांनी तिला शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तिथे दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. रात्री पुन्हा त्रास होऊ लागला तेव्हा तिला पुन्हा रुग्णालयात नेल्यावरही तिला दाखल न करता परत पाठवण्यात आले. बुधवारी पहाटे त्रास सहन होत नाही म्हणून पतीने रुग्णालयात नेले तर काही इंजेक्शन देऊन तिला तिसऱ्यांदा दाखल करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली. मात्र तिसऱ्यांदा रुग्णालयातून परत येत  असताना महिलेचे पोट तीव्रतेने दुखू लागले आणि तिला ऑटोरिक्षातच बाळाला जन्म द्यावा लागला. 
 
या घटनेनंतर जवळपासच्या पोलिसांच्या मदतीने तिला एका खाजगी नर्सिंग होम दाखल करण्यात आले. आता आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती