कारवार समुद्रात देवदर्शनासाठीची बोट बुडाली सहा ठार अनेक बेपत्ता

मंगळवार, 22 जानेवारी 2019 (09:27 IST)
कर्नाटकातील कारवार समुद्राध्ये बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट बुडल्याने सहाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये २४ जण असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी कोळी बांधव आणि तटरक्षक दल यांनी मिळून सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. तर या बोटीमधील इतर १६ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. या घटनेमध्ये जे लोक बुडाले आहेत त्यांची अद्याप माहिती मिळालेली नसल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. 
 
त्यानंतर स्थानिक मच्छिमार आणि कोस्टगार्डच्या जवानांनी सहा जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले होते. मात्र बोटीतील अन्य प्रवासी बेपत्ता असून, बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. दरम्यान, मदत आणि बचाव कार्यासाठी नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांनी घटनास्थळाकडे प्रयाण केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती