निवडणूूक आयोगाच्या सदस्यांनी अलिकडेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या भेटीत कर्नाटकमधील तैनातीसाठी केंद्रीय निमलष्करी दलांच्या जवानांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार बीएसएफ, सीआरपीएफ आणि आयटीबीपी या निमलष्करी दलांचे 52 हजार जवान सुरक्षेसाठी तैनात केले जातील. याशिवाय, कर्नाटकचे एक लाख पोलीसही मतदानावेळी सुरक्षेसाठी सज्ज राहतील.