बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी तालिबानचा विजय साजरा करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर टीका केली आहे. क्लिपमध्ये नसीरने म्हटले आहे की ते हिंदुस्तानी मुस्लिम आहे आणि हिंदुस्थानी इस्लामने स्वतःला जगाच्या इस्लामपासून वेगळे करू नये, अशी वेळ येते कामा नये की आपण त्याला ओळखूही शकणार नाही.
भारतीय मुस्लिमानांनी स्वतःला विचारायला हवे
व्हिडिओ क्लिपमध्ये नसीर म्हणतात, जरी अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा ही जगासाठी चिंतेची बाब असली, तरी यावर भारतीय मुस्लिमांच्या काही वर्गांद्वारे उत्सव साजरा करणं यापेक्षा कमी धोकादायक नाही. आज प्रत्येक भारतीय मुसलमानाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की त्याला आपल्या धर्मामध्ये सुधारणा आणि आधुनिकता हवी आहे की मागच्या शतकांतील रानटीपणा. मी एक भारतीय मुस्लिम आहे आणि मिर्झा गालिबने खूप पूर्वी म्हटल्याप्रमाणे, अल्लाह मियांशी माझे संबंध खूप वेगळे आहेत, मला कोणत्याही राजकीय धर्माची गरज नाही. हिंदुस्थानी इस्लाम हा जगभरातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे आणि देवाने तो काळ आणू नये जेणेकरून ते इतके बदलेल की आपण ओळखूही शकणार नाही.
या व्हिडिओमध्ये नसीरुद्दीन शाह उर्दू बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली. भारतातील काही मुस्लिम संघटनांनी तालिबानच्या अफगाणिस्तानवर कब्जा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नसीरने हा व्हिडिओ त्याच लोकांवर टीका करत रेकॉर्ड केला आहे.