दफनभूमीत मिळाला 433 कोटींचा खजिना, 25 कोटी रोख रक्कम, 12 किलो सोनं आणि 626 कॅरेटचे हिरे

चेन्नई- तामिळनाडू राजधानी चेन्नई आणि कोयंबटूर येथील तीन प्रसिद्ध ज्वेलर्सने आयकर छाप्यांपासून वाचण्यासाठी विचित्र पर्याय शोधला आहे परंतू त्यांच्या हाती यश लागले नाही. या तीन ज्वेलर्सने सर्व रोख आणि दागिने एका दफनभूमीत लपवले परंतू आयकर विभागाने खजिना शोधून काढला.
 
आयकर विभागाच्या या आगळ्या वेगळ्या छाप्यात दफनभूमीतून 433 कोटी किमतीचा खजिना जप्त करण्यात आला आहे. नऊ दिवस सुरू असलेल्या या खजिन्यात 12.53 किलोग्रॅम सोनं, 626 कॅरेटचे डायमंड आणि 25 कोटीची रोख रक्कम मिळाली.
 
आयकर विभागाने 28 जानेवारीला सवर्णा स्टोअर, लोटस ग्रुप आणि जी स्कवॉयर च्या सुमारे 72 जागांवर छापा मारला होता. ज्वेलर्सने सर्व दागिने एका एक एसयूव्हीत भरले आणि रेड पडली त्या रात्री रात्र भर गाडीत फिरत राहिले नंतर एका दफनभूमीत गाढले.
 
सीसीटीव्ही फुटेज बघताना आयकर विभागाच्या टीमला दफनभूमीचा रहस्य कळून आला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती