ज्येष्ठ नागरिकांना त्रास दिल्यास तुरुंगवास

गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (10:37 IST)
मुलांसमवेत राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर किंवा पालकांबरोबर हेतुपुरस्सर गैरव्यवहार करणाऱ्या तसेच त्यांना सोडून देणाऱ्या व्यक्तींना सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दहा हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील असे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. या विधेयकामुळे ज्येष्ठ नागरिक आणि पालक कल्याणकारी कायदा, 2007मध्ये सुधारणा केली जाणार आहे.
 
सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकाद्वारे ज्येष्ठांसाठी एका लवादाची स्थापना करण्यात येणार आहे. 80 वर्षांच्या वरील ज्येष्ठांनी लवादाकडे केलेले अर्ज 60 दिवसांत निकाली काढण्याची तरतूद यात केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती