न्यायालय, लोकांनी कसे वागावे याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे घालून शकत नाही

बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (08:50 IST)
शिखांवरील विनोदांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालये लोकांनी कसे वागावे याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे घालून देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्या समुदायासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे अतिशय कठीण असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. शिखांवरील विनोदांवर बंदी घातली जावी, यासाठी मागील वर्षी वकील हरविंदर चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता २७ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. ‘शिखांवरील विनोद हे शिखांच्या मूलभूत अधिकारांचे आणि सन्मानाचे उल्लंघन आहे. त्यामुळे ज्या संकेतस्थळांवर शिखांवरील विनोद प्रसिद्ध होतात, त्या संकेतस्थळांवर बंदी आणायला हवी,’ असेही हरविंदर चौधरी यांनी म्हटले होते.

वेबदुनिया वर वाचा