पुरुषच ज्येष्ठांचा छळ अधिक करतात

शुक्रवार, 15 जून 2018 (09:07 IST)
महिला पेक्षा पुरुषच ज्येष्ठांचा अधिक छळ करत असल्याची धक्कादायक माहिती हेल्पेज इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. १५ जून रोजी असलेल्या जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त संस्थेने २३ शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती मिळाली आहे. यात मँगलोर, भोपाळ, अमृतरसर, दिल्ली, कानपूर या शहरांत ज्येष्ठांचा सर्वाधिक छळ होत असल्याचा दावा संस्थेने सर्वेक्षणात केला आहे. त्यात ८२ टक्के ज्येष्ठांनी केवळ कुटुंबाची बदनामी होऊ नये, म्हणून छळ होत असतानाही तक्रार केली नसल्याचे सांगितले आहे.
 
धक्कादायक बाब म्हणजे आई-वडिलांचा छळ करण्यात मुले आणि जावई अशा पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचेही सर्वेक्षणात समोर आहे. छळ करणाऱ्या पुरुषांत ५२ टक्के पुरुष मुलगा, तर ३४ टक्के जावयांचा समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारे ज्येष्ठांचा छळ होत असल्याचेही यामध्ये दिसते. त्यात आदर न करणे, गलिच्छ भाषा वापरणे, दुर्लक्ष करणे अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांहून अशा प्रकारे छळ होत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती