या प्रकारे दिली जाते फाशी, जाणून घ्या Step by step
शुक्रवार, 20 मार्च 2020 (06:50 IST)
* फाशीच्या निश्चित वेळेच्या 15 मिनिटं आधी आरोपीला तुरुंगामधून बाहेर काढलं जातं. त्यापूर्वी फाशीची तयारी करण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागतो.
* कोठडीमधून आरोपींना आणताना त्यांच्ये हात मागून करुन रस्सीने बांधले जातात किंवा हातात बेड्या घातल्या जातात.
* आरोपीच्या आजूबाजूला दोन शिपाई असतात.
* फाशी देताना चार ते पाच पोलीस शिपाई उपस्थित असतात.
* फाशीच्या कठड्यावर आरोपींना योग्य ठिकाणी उभं करण्याची जबाबदारी या शिपायांवर असते.
* फाशी देण्याच्या ठिकाणी कोणी काहीही बोलत नाही. केवळ हाताच्या आणि नजरेच्या इशाऱ्यावर सारं काम चालतं.
* फाशीच्या एक दिवस आधी जल्लाद, तुरुंगाचे अधीक्षक आणि फाशी देताना उपस्थित राहणाऱ्या पोलीस शिपायांची एक बैठक होते.
* फाशीच्या वेळी डेप्युटी जेलर तसेच डॉक्टरही उपस्थित असतात.
* फाशी देण्यासाठी 10-15 मिनिटं लागतात.
* फासावर चढवण्याआधी आरोपींचे पायही रस्सीने बांधले जातात.
* नंतर डोक्यावर काळी टोपी घातली जाते.
* आरोपीला फासावर लटकवण्यासाठी उभं केलं जातं तेव्हा फासाच्या खाली जमीनीवर एक वर्तुळ आखलं जातं. त्या वर्तुळातच आरोपीला उभं केलं जातं.
* मानेपर्यंत असणाऱ्या या टोपीवर नंतर फास देणारा दोर टाकला जातो. फाशीचा हा फंदा आरोपीच्या गळ्या भोवती आवळला जातो.
* डोक्यावर काळी टोपी घालणे आणि फास आवळण्याचे काम करताना आरोपीच्या समोर उभं राहत नाहीत.
* आरोपीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभं राहून हे केलं जातं.
* फास व्यवस्थित बसला आहे का नाही हे पाहण्यासाठी आरोपीच्या गळ्यात फास आवळल्यानंतर त्याच्या भोवती गोल प्रदक्षिणा घालून यासंदर्भातील खात्री केली जाते.
* नंतर जल्लाद फाशी देण्यासाठी असलेल्या लीवर जाऊन उभे राहतात.
* तुरुंग अधीक्षकांना अंगठा दाखवून काम पूर्ण झाल्याचा इशारा दिला जातो.
* तरुंगाचे अधीक्षक रुमाल टाकून इशारा देतात आणि जल्लाद खटका खेचतो.
* खटका खेचताच आरोपीच्या पायाखालील लाकडी दारे उघडली जातात आणि आरोपी फासावर लटकतो.
* 10-15 मिनिटं आरोपीला फासावर लटकून ठेवले जाते.
* नंतर डॉक्टर आरोपीच्या मृतदेहाजवळ जाऊन त्याची तपासणी करतात. हृद्याची धडधड थांबली आहे का हे तपासून पाहतात.
* तपासणी केल्यानंतर डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात.
* डॉक्टर शिपायांना मृतदेह फासावरुन खाली उतरवण्याचे संकेत देतात.
* नंतर मृतदेहावर पांढरी चादर टाकली जाते.