गुजरात निवडणूक; भाजपने आनंदीबेन पटेल यांना तिकीट नाकारलं

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री व मोदी यांच्या विश्वासातील नेत्या आनंदीबेन पटेल यांना भाजपनं  तिकीट नाकारल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज सहावी व अखेरची यादी जाहीर केली. एकूण ३४ उमेदवारांच्या या यादीत आनंदीबेन पटेल यांना स्थान देण्यात आलं नसून,आनंदीबेन यांच्या घाटलोडिया मतदारसंघातून त्यांचे विश्वासू भूपेंद्र पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अखेरच्या यादीत पटेल समाजातील तब्बल १२ उमेदवारांना स्थान देण्यात आलं आहे. तर, दोन ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळाली आहे.
 
आनंदीबेन यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी रविवारी प्रचंड गोंधळ घातला होता. कार्यकर्त्यांचा राग शांत करण्यासाठी स्वत: अमित शहा यांना धावाधाव करावी लागली होती. या साऱ्या घडामोडींमुळं आनंदीबेन यांना पक्ष पुन्हा संधी देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपनं त्यांना तिकीट नाकारत सगळ्यांनाच धक्का दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती