सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचार्यांना आता कोरोना लस

गुरूवार, 8 एप्रिल 2021 (07:58 IST)
केंद्र सरकारने सरकारी आणि निम सरकारी कार्यालयातील 45 वर्षांवरील कर्मचार्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात पत्र पाठवले आहे.
 
कार्यालयात कोरोनाचे लसीकरण करण्यात यावे. एकावेळी 100 जणांना लस देण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत एकूण तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीचा डोस देण्यात येत  आहे. आता मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी कार्यालयाच्या ठिकाणी लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती