जागतिक लोकसंख्या 800 कोटी पार, स्थलांतराचा कसा होतोय परिणाम?

शुक्रवार, 12 जुलै 2024 (10:11 IST)
जगाची लोकसंख्या संख्या सध्या 820 कोटी आहे आणि ती वाढून 1030 कोटी होणार असल्याचं युनायटेड नेशन्सच्या ताज्या अहवालात म्हटलंय.
 
जगाची लोकसंख्या 2080च्या मध्यात सर्वोच्च असेल आणि त्यानंतर ती कमी होऊ लागेल असं 'वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेटक्ट्स' नावाच्या या अहवालामध्ये म्हटलंय. आज जन्माला आलेल्या मुलांचं सरासरी आयुर्मान 73.3 वर्षांचं असून 1995 पासून हे सरासरी आयुर्मान 8.4 वर्षांनी वाढल्याचंही हा अहवाल सांगतो.
 
संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असणाऱ्या देशांच्या जनगणनेचा डेटा, जन्म आणि मृत्यू दर आणि लोकसंख्येशी संबंधित इतर पाहण्यांच्या मदतीने युनायटेड नेशन्स गेल्या 50 वर्षांपासून नियमितपणे जागतिक लोकसंख्येविषयीचे अंदाज मांडत आलेलं आहे.
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती