रवी पुजारीला बंगळुरूत आणण्यात आलं

सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (10:21 IST)
खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हव्या असलेल्या रवी पुजारीला सेनेगलमध्ये पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला बंगळुरूमध्ये आणण्यात आलं आहे.
 
बॉलीवूड कलाकारांसह अनेक बिल्डर्सना त्याने धमकावल्याचे आरोप आहेत. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात रवी पुजाराने दाखल केलेली याचिका सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. भारतात परतायचं नसल्याने रवी पुजारीने कायदेशीर मार्ग अवलंबला होता.
 
रवी पुजारीवर भारतात खंडणी, हत्येसह 200हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. सेनेगलमध्ये रवी पुजारी, अँथनी फर्नांडिस या नावाने राहत होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती