लडाखबद्दल कसल्या काळजीत आहे मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक (फुनशुक वांगड़ू)? Exclusive Interview

लडाख रहिवासी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, इंजिनियर आणि शोधक सोनम वांगचुक यांच्या नावाला आणि कामाला देशातच नव्हे तर जगात वेगळ्या ओळखीची गरज नाही.
 
आमिर खानच्या हिट '3 इडियट्स' चित्रपटाचं 'फुनशुक वांगड़ू' हे पात्र देशाच्या घरोघरात पोहचणारे सोनम वांगचुक लाईम लाइटहून दूर आपल्या कामात मग्न असतात. लडाख स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर आता पुन्हा एकदा महान इनोवेटर सोनम वांगचुक यांची चर्चा आहे. यावर त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी लोकं उत्सुक आहेत.
 
वेबदुनियाच्या पॉलिटिकल एडिटरने प्रसिद्ध शोधक सोनम वांगचुक यांच्याशी लडाखबद्दल विस्तृत चर्चा केली. लडाखला जगाच्या नकाश्यावर एक वेगळी ओळख देणार्‍या रॅमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते सोनम देखील या निर्णयावर खूप खूश आहेत.
 
वेबदुनियाशी एक्सक्लूसिव्ह बातचीत करताना वांगचुक म्हणाले की कलम 370 आणि 35 A हटवून केंद्र शासित प्रदेश झाल्यामुळे लडाखच्या लोकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे आणि आज लोक आनंदात आहे. 
लडाखला वेगळं करण्याचा निर्णय योग्य : सोनम वांगचुक लडाखला जम्मू काश्मीरहून वेगळं करण्याच्या निर्णयाला पूर्णपणे योग्य असल्याचे सांगतात. ते म्हणतात की जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या भाषेपासून वातावरणापर्यंत मोठं अंतर आहे. सोनम उदाहरण देत सांगतात की त्यांना लहानपणी लडाखची भाषा, संस्कृती आणि निसर्गाकडे लक्ष देत नसल्याचं जाणवत होतं.
 
लडाखमध्ये उर्दू भाषा बोलली जात नाही परंतू शाळेत उर्दू शिकवली जात होती. कुठेही लडाखच्या गरजांकडे लक्ष दिले गेले नाही. म्हणून लडाख वेगळं झाल्यामुळे आता विकासाचा मार्ग मोकळा होईल.
 
लडाख बनू शकतं पैशांची खाण : सोनम वांगचुक आनंदी आहे तरी त्यांना एक गोष्टीची भीती जाणवत आहे. 
 
बदलत असलेल्या परिस्थितीत लडाखच्या वातावरण आणि इकोलॉजीमुळे ते जरा काळजीत आहे. ते आता लडाखसाठी विशेष प्रकाराच्या पर्यावरणीय प्रोटेक्शनची मागणी करत आहे. 
वेबदुनियाच्या या प्रश्नावर की आता लडाख केंद्र शासित प्रदेश झाल्यावर तेथे औद्योगिक गुंतवणूक होऊ शकेल, त्याने लडाखला नुकसान होईल? यावर वांगचुक म्हणतात की याची शक्यता अधिक आहे कारण आता लडाखमध्ये प्रोटेक्शन नाही, जे पूर्वी 370 आणि 35A अतंर्गत होते, त्यामुळे आता कुठलेही कवच नाही.
 
अशात त्यांना आता लडाखच्या संस्कृती आणि परंपरेपेक्षा पर्यावरणाची अधिक काळजी आहे. ते म्हणतात की संस्कृती तर काळांपासून लोकांच्या भेटी आणि वेगळं होत असल्यामुळे निर्मित होते आणि बिघडते.
ही आहे सर्वात मोठी काळजी : सोनम वांगचुक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतात की आता केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर आता या वाळवंटात (लडाख) लोकांना पर्यटन आणि उद्योग स्थापित करून पैसा कमावत येऊ शकतो असे दिसल्यास येथील नाजुक पर्यावरण बिघडेल. 
 
सोनम यांनी म्हटले की अश्या औद्योगिक प्रगतीचा का फायदा ज्यामुळे आमचं पाणी संपेल आणि लोकं भुकेले राहतील, म्हणून आज आम्हाला या नाजुक स्थळांची काळजी घ्यावी लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती