मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडा पोलीस आणि 28 आरआर आर्मीच्या जवानांनी रविवारी जिल्ह्यातील लोलाब भागात संयुक्त दहशतवादविरोधी अभियान राबवले. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी आणखी काही दहशतवादी लपल्याची बातमी आहे. ऑपरेशन चालू आहे.