प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये लागली भीषण आग
मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांनी भरलेली बस हाजीपूरहून पाटण्याकडे जात होती. महात्मा गांधी सेतू पुलाजवळ या बसचा अपघात झाला. बसमध्ये अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. यावेळी बसमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बस मधून बाहेर निघाले. बस पूर्णपणे जळून राख झाली.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाटणा आणि हाजीपूर येथील अग्निशमन दलाच्या तुकड्या दाखल झाल्या.
पोलिसांनी सांगितले की, पुलावर एका प्रवासी बसला आग लागली. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहे.