तामिळनाडूत भाजपची अण्णाद्रमुकसोबत युती

मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (18:59 IST)
तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार असून याबाबत दोन्ही पक्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. विशेष म्हणजे या महायुतीत पट्टली मक्कल काची (पीएमके) पक्षही सहभागी झाला आहे.  तामिळनाडूतील या युतीबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी एकत्रितपणे घोषणा केली. यावेळी गोयल यांनी विधानसभेच्या २१ जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप अण्णाद्रमुकला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. 
 
उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी आगामी लोकसभा निवडणूक भाजप-अण्णाद्रमुक तामिळनाडू आणि पदुचेरीत एकत्रपणे लढणार असून भाजप ५ जागांवर लढणार असल्याचे सांगितले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती