तर दुसरीकडे दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी म्हणाले की, आगामी दिल्ली निवडणुकीत भाजपने आधीच पराभव स्वीकारला आहे. भाजपला मागच्या दाराने केजरीवाल सरकार बरखास्त करायचे आहे. निवडून आलेले सरकार पाडणे हे भाजपचे एकमेव काम आहे. भाजपला मुख्यमंत्री केजरीवाल यांची भीती वाटते. केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेची सेवा केली आहे. हे भाजपचे नवे षडयंत्र आहे. दिल्ली निवडणुकीत भाजपचा पराभव होईल आणि भाजपला शून्य जागा मिळणार आहेत.असे अतिशींनी म्हटले आहे.