स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला

सोमवार, 27 मे 2024 (18:15 IST)
स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली असून तीस हजारी कोर्टाकडून त्यांना मोठा धक्का बसला असून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
सोमवारी विभव कुमार यांची न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी स्वाती मालिवाल या न्यायालयात हजर होत्या. या वेळी विभव यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की शरीराच्या संवेदनशील भागांवर जखमेच्या कोणत्याच खुणा नसल्याने खुनाचा प्रयत्न करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच स्वाती यांचा जखमा स्वतःहून होऊ शकतात.  
 
आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी अलीकडेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. या प्रकरणी विभव सध्या पोलिस कोठडीत आहे. अशा स्थितीत बिभवच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता
 
आज कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वाती मालीवाल कोर्ट रूममध्ये हजर होत्या. यावेळी, जेव्हा स्वाती मालीवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्याचा व्हिडिओ कोर्टात न्यायाधीशांना दाखवला जात होता आणि विभवचे वकील न्यायाधीशांना एफआयआरबद्दल सांगत होते तेव्हा स्वाती मालीवाल यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. या वेळी स्वाती मालीवाल यांनी कोर्ट रुममध्येच रडायला सुरुवात केली आणि नंतर त्या मूकपणे कामकाज ऐकू लागल्या.

दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला आहे
विभव कुमार यांच्यावरील आरोप आणि अटकेनंतर स्वाती मालीवाल यांच्यावर आम आदमी पक्षाकडून विविध प्रकारचे आरोप करण्यात येत होते.

Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती