बाबा घर विका पण माझ्या कॅन्सरचा इलाज करा : मृत्यूनंतर मुलीचा व्हिडिओ झाला Viral

कॅन्सरशी लढत असलेल्या एका मुलीने आपल्या वडिलांकडे उपचारासाठी मदत मागितली होती. ती शेवटापर्यंत म्हणत होती की घर विका, पण माझ्या कॅन्सरचा उपचार करवा. पण अस न झाल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा हा व्हिडिओ मेसेज वायरल झाला आहे, जो तिने वडिलांना वॉट्सऐपवर पाठवला होता. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहे. मुलीचे नाव साई श्री होते. तिला बोन मॅरो कॅन्सर होता. तिच्या आईने 40 लाख रुपए तिच्या उपचारावर खर्च केले  होते. मेसेज वायरल झाल्यानंतर वडिलांनी घराबाहेर केले होते.   
 
- वृत्तानुसार मेसेज वायरल झाल्यामुळे नाराज वडिलांनी 13 वर्षाची साई श्री आणि तिच्या आईला घराबाहेर काढले होते. वडिलांवर असा ही आरोप लावण्यात आला आहे की त्याने तेलुगू देशम पार्टीचे एमएलए बोंदा उमामहेश्वर राव यांची मदत घेऊन प्रकरण सेटेल करण्यासाठी गुंडे देखील पाठवले होते.  
 
- सांगण्यात आले आहे की पोलिसांनी गुंड्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यास मना केले आहे.  गुंड्यांना शिव कुमार नावाच्या व्यक्तीने पाठवले होते. कुमाराला एमएलएचा सपोर्टर सांगण्यात आले आहे.  
 

ह्युमन राइट्स कमिशनमध्ये पोहोचले प्रकरण  
- एनजीओ बलाला हक्कुला संगमाची प्रेसिडेंट अच्युता रावने म्हटले, "आम्ही स्टेट ह्युमन राइट्स कमिशन (SHRC) मध्ये या प्रकरणाबद्दल पिटिशन दर्ज केली आहे. आम्ही लगेच कारवाईची मागणी केली आहे." SHRC ने सिटी पोलिस कमिशनराकडून या घटनेची संपूर्ण माहिती मागितली आहे.  
साभार :  7am NEWS

वेबदुनिया वर वाचा