तब्बल ११ वर्षानंतर हैदराबाद साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल

मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (16:36 IST)
तब्बल ११ वर्षानंतर हैदराबाद येथे ४४ जणांचा मृत्यू आणि ६८ जखमी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. लुम्बिनी पार्क आणि गोकूळ चाट येथील बॉम्बस्फोट प्रकरणी येथील स्थानिक न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनचे (आयएम) एमडी अकबर इस्माईल चौधरी आणि अनीक शफीक सय्यद या दोघांना दोषी ठरविले आहे. या दोघांना येत्या सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
 
या प्रकरणात फारुक शर्फुद्दीन तारकश आणि सादिक इसरार शेख यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर बॉम्बस्फोट प्रकरणातील इंडियन मुजाहिदीनचे संस्थापक रियाज भटकळ, इक्बाल भटकळ आणि आमीर रेझा खान हे फरार आहेत. चेरलापल्ली तुरुंगातच न्यायालयीन निवाडा देण्यात आला. तेथे तशी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. या तुरुंगात बॉम्बस्फोट प्रकरणातील चार संशयितांना ठेवण्यात आले आहे. तेथेच न्यायाधीशांसमोर चौघा संशयितांना सादर करण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती