अबब... एवढे हाग टोमॅटो व बटाटे

रविवार, 2 सप्टेंबर 2018 (00:35 IST)
एखाद्याने दक्षिण अमेरिकी देश व्हेनेझुएलातील लोकांना महागाई काय असते, हे विचारावे. चलनाचे एवढे पतन येथे झालेले आहे की, दोन वेळच्या अन्नाला येथील करोडपतीही मोताद झाला आहे. लाखो बोलिव्हर (देशाचे चलन) एक किलो भाजी खरेदी करण्यासाठीही द्यावे लागत आहेत. परिस्थिती अशी झाली आहे की, बॅगभर नोटा घेऊनही तुम्ही येथे पोटभर पूर्ण कुटुंबाला खाऊ घालू शकत नाहीत. या काही उदाहरणावरून तुम्हाला अतिप्रचंड महागाईचा अंदाज येईल. येथे एक किलो बटाट्यांची किंमत 20 लाख बोलिव्हरवर गेली आहे, तर टोमेटो 50 लाख बोलिव्हर, एक किलो गाजर 30 लाख बोलिव्हर, एक किलो तांदूळ 25 लाख बोलिव्हर आणि एक किलो पनीर 75 लाख बोलिव्हरमध्ये मिळत आहे. दुसरीकडे एक प्लेट नॉनव्हेज थाळी 1 करोड बोलिव्हरमध्ये मिळत आहे. 
 
या देशाची परिस्थिती एवढी बिघडली आहे की, लोक व्हेनेझुएला सोडून शेजारी देश कोलंबियाला पळून जाण्यासाठी मजबूर झाले आहेत. दुसरीकडे अनेक लोक ब्राझीललासुद्धा जात आहेत. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात घट झाल्याने व्हेनेझुएलावर आर्थिक संकट आले आहे. गरजेपेक्षा जास्त चलन येथील सरकारने छापले, यामुळे त्याची किंमत खूप कमी झाली, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उपासमारीची परिस्थिती तयार झाली आहे. या कठीण परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो राजधानी कराकसमध्ये सातत्याने बैठका घेत आहेत. त्यांनी इतर देशांना मदतीचे आवाहनही केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती