मिळालेल्या माहितीनुसार जखमी मुलाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिकारी म्हणाले की आम्ही हा तपास लावत आहोत की या लहान मुलाकडे पिस्तूल आले कसे. तो बॅगमध्ये घेऊन कसा शाळेत आला? तसेच ते म्हणाले की जिल्ह्यामध्ये शाळांना सांगण्यात आले आहे की विद्यार्थ्यांच्या शालेय बॅग चेक कराव्या. या घटनेनंतर पालकांची चिंता वाढली आहे.