या बैलाची किंमत आहे 1 कोटी, स्पर्मची किंमत हजारात, जाणून घ्या वैशिष्ट्ये

सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (16:08 IST)
बंगळुरूच्या कृषी मेळाव्यात सध्या एक  बैल चर्चेत आहे. बऱ्याच लोकांनी या बैलांसह सेल्फी घेतली. याचे प्रमुख कारण असे आहे की या बैलाची प्रजाती हल्लीकर आहे. या साढे तीन वर्षांच्या बैलाच्या वीर्याची किंमत हजारात असल्याचे सांगितले जात आहे. 
 
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील कृषी मेळाव्यात 1 कोटींचा बैल चर्चेचा केंद्र बिंदू राहिला. जत्रेत पोहोचलेल्या लोकांनी बैलासोबत सेल्फी काढले. बैलाचे मालिक बोरेगौडा  सांगितले की आम्ही त्याला कृष्ण या नावाने ओळखतो. 
 
या बैलाची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे बैल मालक बोरेगौडा यांनी सांगितले. हा बैल हल्लीकर जातीचा आहे, जो पशुपालकांमध्ये सर्वोत्तम आहे. त्यांनी सांगितले की, त्याच्या वीर्याला खूप मागणी आहे. जत्रेत बैलाची क्रेझ इतकी आहे की लोक त्यांच्या सोबत सेल्फी काढत आहेत. हळू हळू ही प्रजाती नाहीशी होत आहे.
 

A 3.5 yr old bull named Krishna, valued at around Rs 1 Cr, has become centre of attraction at Krishi Mela in Bengaluru

Hallikar breed is mother of all cattle breeds. Semen of this breed is in high demand & we sell a dose of the semen at Rs 1000, said Boregowda, the bull owner pic.twitter.com/5cWZ5RW1Ic

— ANI (@ANI) November 14, 2021
एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर याची काही छायाचित्रे शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. हल्लीकर जातीच्या बैलाच्या शुक्राणूंना मोठी मागणी असल्याचे बैल मालक बोरेगौडा सांगतात त्याच्या वीर्याचा एक डोस ते एक हजार रुपयांना विकतात. एवढेच नाही तर हल्लीकर जातीची सर्वच गुरे A2 प्रोटॉन असलेल्या दुधासाठी ओळखली जातात. आता ही प्रजाती हळूहळू नामशेष होत आहे. सध्या हा बैल एक कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रियाही येत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती