Madhya Pradesh News: देवासमधील नयापुरा भागात एका घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या खालच्या मजल्यावर दूध डेअरीचे दुकान असून तेथे आग लागली. हळूहळू आगीने उग्र रूप धारण केले आणि इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. या लागलेल्या भीषण आगीत पती, पत्नी आणि दोन मुलांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला.