इंडिया संवाद वेबसाइटच्या हवाल्याने सोशल मीडियावर इराणी यांच्या या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. यासाठी LooteriMinister हा हॅशटॅग वापरला जात आहे. इराणी यांनी वैयक्तिक कारणांसाठी हे खरेदी केली असल्याने आठ लाखांचे हे बिल वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा यांनी ते नाकारले. यावरून इराणी आणि वर्मा यांच्यात कुरबूर झाल्याचे बोलले जात आहे.
स्मृती इराणी यांनी साड्या व गणेश मूर्ती खरेदी केले होते. त्यांच्या खासगी कर्मचार्यांनी ते बिल सचिव रश्मी वर्मा यांच्याकडे पाठवले. परंतु ही खरेदी वैयक्तिक कारणासाठी असल्यामुळे बिल अदा करता येणार नाही, असे म्हणत वर्मा यांनी ते परत पाठवले. यावरून इराणी आणि वर्मा यांच्यात वाद झाला. वर्मा यांनी कॅबिनेट सचिव यांच्याकडेही यासंबंधी तक्रार केल्याचे म्हटले जाते.