देवबाप्पाला सगळ्या भाषा येतात असे लहानमुलं नेहमीच आपल्या बोबड्या शब्दात म्हणत असतात. आता हिंदीत बाल गणेशा पाहिलेल्या मुलांना गणपती बप्पा चक्क इंग्रजीत बोलतानाही दिसणार आहेत.
माय फ़्रेंड गणेशा नावाने येणाऱ्या चित्रपटात गणेशा टी- शर्ट, बरमुडा, आणि टोपी अशा नव्या रूपात अवतरणार आहेत. इतकेच नाही तर बप्पाच्या हातावर चक्क स्वस्तिकाचे एक टॅटूही असणार आहे.
22 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून, या चित्रपटात गणपतीचे वाहन उंदीरही त्यांच्या सोबत असणार आहे.
चित्रपटाचा पहिला भाग लोकांना आवडल्याने दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव एस रुईया यांनी दिली.