या प्रकरणात कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाचे तंत्र अधिकारी किरण जाधव यांना भिवंडी जवळील एका गोदामात खते आणि कीटकनाशकांचा बेकायदा साठा करण्यात आला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. जाधव यांनी या माहितीची खात्री केल्यानंतर किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई पथकाने गोदाम परिसरात सापळा लावला. या पथकाने भिवंडीतील एका वेअर हाऊसवर छापा टाकला. अरविंद पटेल यांच्या नावे असलेल्या गोदामात खत, कीटकनाशक ठेवण्यात आली होती. या साठ्या संदर्भात कारवाई पथकाने पटेल यांच्याकडे कागदपत्रे मागितली. खत साठवणुकीच्या परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे आढळले. साठा बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत कारवाई पथकाने तो जप्त केला.
कीटकनाशके, विद्राव्य खते, अन्नद्रव्य असा एकूण एक कोटी ७५ लाख रुपये किमतीचा साठा जाधव यांच्या पथकाने जप्त केला आहे.