समीर वानखेडेंचा राजकारणात प्रवेश, शिवसेना शिंदे गटात प्रवेश

गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (12:33 IST)
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे शिंदे गटाच्या तिकिटावर मुंबईतील धारावी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. तसेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करून समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
 
चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक करून प्रसिद्धीझोतात आलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते एनसीबीची नोकरी सोडून राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करू  शकतात. तसेच त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.   
 
तसेच यासोबतच ते मुंबईतील धारावी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे IRS अधिकारी आहे. व 2021 मध्ये, त्यांनी NCB, मुंबईचे झोनल डायरेक्टर म्हणून पदभार स्वीकारला.
 
तसेच समीर वानखेडे गेल्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला गोव्यातील एका क्रूझमधून अटक केली होती. क्रूझ पार्टीत ड्रग्ज घेतल्याचा आरोप त्याच्यावर होता. पण काही दिवसांनी आर्यन खानची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशीही करण्यात आली होती.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती