न्या. गिरीष कुलकर्णी व न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने या फेस्टिव्हल हिरवा कंदील दाखवला. मॉलमधील मनोरंजन जागेचा वापर अन्य कामासाठी केला जाऊ शकत नाही, असे पालिकेच्या नियमांत कुठेही नमूद नाही. मॉलमध्ये केवळ तीन दिवसांसाठी फेस्टिव्हल होणार आहे. मनोरंजनाचा अर्थ मनोरंजन करणाऱ्या गोष्टी असा होतो. मॉलमध्ये केवळ खरेदीसाठी लोकं जात नाहीत. तर तेथील विविध गोष्टी बघितल्या जातात. मॉलमधील खाण्याचे ठिकाण, खेळण्याचे ठिकाण, चित्रपटगृह येथेही लोकं जात असतात. त्यामुळे मॉलमधील मोकळ्या जागेचा वापर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यासाठी होत असेल तर त्यात गैर काहीच नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.
२८ ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान ice-cream fest आयोजित करण्यात आला आहे. आर सिटी मॉलमधील कोर्ट यार्ड या मोकळ्या जागेत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यास परवानगी द्यावी, अशी विनंती मॉलने पालिकेकडे केली होती. १८ एप्रिल २०२३ रोजी एन वॉर्डचे सहाय्यक अभियंता यांनी या फेस्टिव्हलसाठी परवानगी नाकारली असल्याचे कळवले. त्याविरोधात आर मॉल प्रा.लि. यांनी याचिका केली होती. महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor