सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.विरोधक सत्ताधारी यांना निशाणा बनवत आहे. या प्रकरणात स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चेतन पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. या वर प्रतिक्रिया देत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यात स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा कधीच कोसळला नसता.
मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मला आठवत आहे की, मुंबईत 55 उड्डाणपूल बांधकाम करण्याच्या वेळी एकाने मला मूर्ख बनवले त्याने लोखंडावर पाउंडसह हिरवा रंगाचे पॉलिश केले आणि कधीच गंजणार नाही असे सांगितले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि गंजणारे लोखंड घेतले. आता त्याला गंज चढत असल्याचे ते म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामात जर का स्टेनलेस स्टील वापरले असते तर कदाचित हा पुतळा कोसळला नसता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील नटबोल्ट गंजत असल्याची माहिती समोर आल्यावर सार्वजनिक विभागाने नौदलाला कळवून देखील नौदलाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. हा पुतळा 4 डिसेंबर रोजी नौदल दिनाच्या निमित्त उभारण्यात आला असून त्यात 2 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च आला असून या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.