शेळके यांना सलाम: रेल्वेमंत्र्यांनी 50 हजारांचे बक्षीस दिले, पॉईंटमनने त्याच मुलाला अर्धा रक्कम दिली

शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (11:45 IST)
मुंबई रेल्वे विभागातील वांगणी रेल्वे स्थानकात सहा वर्षाच्या मुलाचा जीव वाचविल्यानंतर संपूर्ण देशाचे कौतुक जिंकणार्‍या मयूर शेळके याने पुन्हा महानतेचे उदाहरण दिले आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शेळके याचे कौतुक करत 50 हजार रुपयाचं बक्षीस घोषित केलं. लवकरचही रक्कम त्याला ‍मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच शेळके यांनी बक्षिसाची अर्धी रक्कम त्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याची घोषणा केली आहे ज्याचा त्यांनी जीव वाचवला.
 
मयूर शेळके यांच्या शौर्याचे आणि सेवेचे चारीबाजूला कौतुक होता आहे. मुलाचा जीव वाचण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्लेखनीय आहे की ठाण्याच्या वांगणी स्टेशनावर ट्रेन येणार असताना आईसोबत प्लॅटफॉमवर चालत असलेला सहा वर्षाचा मुलगा तोल गेल्याने ट्रॅकवर पडला. त्या मुलाची अंध आई चाचपडत असताना तेथे प्वॉइंटमॅन मयूर शेळके यांनी जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमकुल्याचा जीव वाचवला होता. 
 
ही पूर्ण घटना रेल्वेच्या सीसीटीव्हीत कॅप्चर झाली आणि व्हिडिओ रेल्वे द्वारा शेअर करण्यात आला. ही घटना 17 एप्रिल रोजी घडली होती. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देखील ट्विट करत शेळके यांचं कौतुक केलं आणि पन्नास हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती