मुंबईतील कल्याण येथे घरगूती वादातून सासरा सूनेच्या तोंडावर थुंकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा असून सुनेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र हे सर्व भाजपा नेत्यांचे कटकारस्थान असून सर्व आरोप खोटे असल्याचा दावा शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांनी केला आहे.
दरम्यान कल्याण तालुक्याचे विधानसभा संघटक असणारे एकनाथ पाटील यांचं म्हणणं आहे की, “मी ५५ वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर कोणीही असा आरोप केला नाही. हा व्हिडीओ आहे दोन वर्षांपूर्वीचा आहे. पोलिसांनी आमच्यातील वाट मिटवला होता. भाजपाच्या संदीप माळी यांनी राजकीय फायद्यासाठी सूनेला हाताशी धरुन माझी बदनामी सुरु केली आहे. हे सर्व आरोप खोटे आहेत.