पनवेलला जायचं होतं पण कल्याणला पोहचली, हायटेक वंदे भारत ट्रेन कशी रस्ता चुकली? रेल्वेने दिले कारण

मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (09:38 IST)
Mumbai News: सध्या सोशल मीडियावर गोवा वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. तसेच गोव्याला जाणारी वंदे भारत ट्रेन कल्याणमध्ये पोहोचल्याचे बोलले जात आहे. आता स्वत: रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढे येऊन याप्रकरणी खुलासा केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे गाडीचा मार्ग बदलण्यात आला असून मार्ग वळवावा लागल्याची चर्चा आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत ट्रेन आपल्या नेहमीच्या मार्गापासून गेली होती. दिवा स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या बिघाडामुळे गाडी पनवेल स्थानकाचा मार्ग न घेता कल्याण मार्गावर गेली आणि वंदे भारत 90 मिनिटे उशिराने गोव्यात पोहोचली. तसेच ही गाडी कल्याण स्थानकात सकाळी सात वाजता पोहोचली. त्यानंतर ती पुन्हा दिवा स्थानकाकडे वळवण्यात आली, जिथे ती सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी  पोहोचली. आता या बातमीकडे लोकांचे लक्ष लागले कारण वंदे भारत ही ट्रेन वेळेवर पोहोचते, अशाप्रकारे 90 मिनिटे उशिरा पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या ट्रेनचा वेगही सामान्य गाड्यांपेक्षा जास्त आहे.
 
मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ स्वप्नील नीला यांनी सांगितले की, सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे पॉईंट क्रमांक 103 वर काही तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा जंक्शनवर सकाळी सुमारे 35 मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली होती.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती