समीर वानखेडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्या महिन्यात समीर वानखेडे आणि इतर चौघांविरुद्ध आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. तथापि वानखेडे यांनी नंतर एफआयआर रद्द करण्याची आणि कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
उच्च न्यायालयाच्या सुटी खंडपीठाने दिलासा दिला होता
मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठाने गेल्या महिन्यात वानखेडे यांना अंतरिम दिलासा देत तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. तत्पूर्वी, 2 जून रोजी सीबीआयने वानखेडे यांच्या याचिकेला उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करून अंतरिम संरक्षण आदेश मागे घेण्याची आणि याचिका फेटाळण्याची मागणी केली होती.