महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार राजनाथ सिंह यांचे विधान

रविवार, 17 नोव्हेंबर 2024 (16:21 IST)
सध्या महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. भाजपा महायुतीचे पुणे  कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल कांबळे  यांचा प्रचार करण्यासाठी गोळीबार मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. त्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर सभा घेतली. या वेळी बोलताना ते म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत महायुतीच येणार, सत्ता महायुतीचीच होणार आहे. 

या वेळी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे, राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी, माजी मांत्री दिलीप कांबळे,भाजप शहराध्यक्ष धिरज घाटे, श्रीनाथ भिमाले,आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे,सुशांत निगडे, अर्चना पाटील, विवेक यादव ,प्रियंका श्रीगिरी  महेश पुंडे यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
या वेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, आधुनिक भारताच्या विकासासाठी बाबा साहेब आंबेडकर यांचे मह्ह्त्वाचे योगदान आहे. ते मान्य करावे. मात्र सध्या कांग्रेस संविधानाला घेऊन खोटे नरेटिव्ह पसरवत आहे.

आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही.  नाही काँग्रेसच्या काळात डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळायला हवं होतं मात्र ते काँग्रेसने दिला नाही. राजकारण हे केवळ सरकार बनवण्यासाठी नाही तर विकासासाठी आणि देश बनवण्यासाठी केला गेला पाहिजे.

आम्ही महिला केंद्री विकासाची संकल्पना नेहमी मांडली आहे, लाडकी बहीण, उजवला योजना या त्यांचाच भाग आहेत. आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला आहे. या उलट कॉँग्रेसने महिला सक्षमीकारणाचा विचार केला नाही. भाजपने आता संसदेतही महिलांना समान संधी दिली आहे.
 
भाजपने कधी संविधानाचा अवमान केला नाही, कॉँग्रेसने संविधानाच्या प्रस्ताविकेत बदल करून देशाची फसवणूक केली आहे. आता जाती जनगणनेच्या माध्यमातून देशाला जाती जाती मध्ये वाटण्याचे पाप कॉँग्रेस करत आहे. 
आज पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्यामुळे मागील दहा वर्षात भारताचे जगात राजकीय वजन वाढल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती