पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची धमक आता महिलामध्येही निर्माण झाली आहे. पुरूषाच्या स्पर्धेत सहभाग घेऊन त्या पुरूषांनाच मागे टाकून विक्रम नोंदवू लागल्या आहे. अशाच एका महिलेने पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला आहे.
वीणा सहारन असे या युवतीचे नाव. राजस्थानची राजधानी जयपूर येथील वीणाची स्वप्ने आकाशव्यापी होती. म्हणूनच दिल्ली विद्यापीठातून भौतिक विषयातील पदवी प्राप्त केल्यानंतर वीणा डिसेंबर 2002 मध्ये हवाई दलात रूजु झाली. भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर झालेल्या वीणाने सगळ्यात मोठे व शक्तीशाली समजल्या जाणार्या आयएल 76 या विमानाचे पायलट होण्यापर्यंत धडक मारली आहे.
वीणा सहारन यापूर्वी हवाई दलाच्या एएन 32 ह्या विमानाची पायलट होती. तिने आग्रा येथे मेंटनन्स कन्वर्जन कोर्स करून 'गजराज' या नावाने ओळखल्या जाणार्या हवाई दलाच्या महाकाय आयएल 76 विमानाची पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला. वीणा सध्या हवाई दलाच्या नागपूर स्क्वाड्रन 44 मध्ये आहे. सुमारे दोन हजार तासाची भरारी मारण्याचा अनुभव तिच्या गाठी आहे.
पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची धमक आता महिलामध्येही निर्माण झाली आहे. पुरूषाच्या स्पर्धेत सहभाग घेऊन त्या पुरूषांनाच मागे टाकून विक्रम नोंदवू लागल्या आहे. अशाच एका महिलेने पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला आहे.
एएन 32 या विमानापासून ते आयएल 76 पर्यंतची यशस्वी भरारी मारण्याचा इतिहास वीणाच्या नावावर आहे. 'गजराज'ला चार इंजिने असून अशा शक्तिशाली व महाकाय विमानाची पहिली महिला पायलट बनणे ही खरोखरच मोठी कामगिरी आहे. वीणाचे वडील संरक्षण अधिकारी म्हणून जयपूर येथे कर्तव्य बजावत आहेत.
वीणाच्याच पावलावर पाऊल टाकत भारतीय हवाई दलाची फ्लाइट लेफ्टनंट मोनिकानेही पहिली तांत्रिक अधिकारी बनण्याचा मान मिळवला आहे.