पोह्यांचे कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवून घ्यावे. तसेच यामधील सर्व पाणी चाळणीच्या मदतीने काढून घ्यावे. यानंतर बटाट्याचे साल काढून घ्यावे. मग टोमटो आणि कांदा बारीक चिरून घ्यावा. आता पोह्यांमध्ये कांदा, टोमॅटो, चाट मसाला, तिखट, चिविनुसार मीठ आणि कोथिंबीर घालावी. तसेच बटाटा मिक्स करून तुम्हाला आवडेल तो शेप द्या. कटलेट्स आता तांदळाच्या पिठामध्ये ठेऊन मग एक एक करून कढईमध्ये सोडा. हलका सोनेरी कलर येईसपर्यंत टाळून घ्या. तसेच गरम गरम चटणीसोबत सर्व्ह करावे. तर चला आपले पोह्यांचे कटलेट तयार आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.