Matka Roti भारतात पोळीचे विविध प्रकारा पाहायला मिळतात. चपाती, फुलका, नान, तंदुरी ते लच्छा... यासोबत भाजीची मजाच वेगळे असते. परंतु या सर्वांपैकी एका पातळ पोळी प्रसिद्ध आहे जी बहुतेक तरी सर्वात पातळ असावी. विर्दभातील मटका रोटी अशी याची ओळख आहे.
या आगळ्यावेगळ्या पोळीला विदर्भात मटका रोटी, लंबी रोटी किंवा मांडे देखील म्हणतात. रुमाली रोटी सारखी दिसणारी ही रोटी पूर्णंत: गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते. ही पोळी बनविण्यासाठी वेगळा स्पेशल माठ तयार करण्यात येतो.
माठावरच्या लांब रोटी नागपूरची फेमस असून लोक नॉनव्हेज, पनीर, पाटवडी रस्सा किंवा आंबरस आणि इतर चमचमीत पदार्थांसोबत यावर ताव मारतात. ही रोटी तयार करणे म्हणजे कौशल्याचा काम आहे. यासाठी गहू बारीक दळून 15- 20 मिनिटे भिजून घ्यावं लागतं. मोठ्या परातीत पिठात पाणी टाकत पीठ भिजवलं जात आणि वारंवार पटकलं जातं. त्यात चिक्की येईपर्यंत पटकलं जातं. नंतर पिठाचा गोळा हातावर लांब करुन अलगद माठावर टाकला जातो.