Vastu Tips : वास्तुनुसार दवाखान्यात पार्किंगची जागा कशी असावी!

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (09:51 IST)
'पार्किंग', 'वाहने ठेवण्याची जागा दवाखान्याच्या उत्तरेस किंवा पूर्वेकडे असावी. 
 
पाऊसाचे पाणी खेळाच्या मैदानाच्या उत्तरेस, पूर्वेकडे किंवा ईशान्य दिशेस असावे.  
 
दवाखान्याच्या ईशान्येस असलेली मोकळी जागा हंगामी पार्किंगसाठी वापरली जाऊ शकते.  
 
छोट्यावाहनांच्या पार्किंगसाठी दवाखान्याचा ईशान्येस असलेला भाग वापरला जावा.
 
तळघरात पार्किंगची व्यवस्था नसल्यास पार्किंग आणि हिरवळीसाठी उत्तरेचा किंवा पूर्वेकडचा भाग मोकळा राखावा.  
 
दवाखाना पश्चिमेस किंवा दक्षिणेकडे असल्यास आणि कार पार्किंगसाठी पश्चिमेस किंवा दक्षिणेकडे जास्त मोकळी जागा असल्यास आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकेल.

पार्किंगच्या जागेची दक्षिणेची किंवा पश्चिमेकडची तटबंदी  उत्तरेच्या आणि पूर्वेकडच्या भिंती पेक्षा अवजड आणि ऊंच असावी.  
 
पोर्टिको पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावा. पश्चिमेकडे असल्यास त्यास  नैऋत्येतील कोपर्‍यापासून दूर राखावे. 
 
उत्तरेस किंवा पूर्वेकडे पोर्टिको असल्यास त्याच्या छप्पराचा तळभाग इमारतीच्या तळभागापेक्षा कमी असावा. पार्किंगसाठी कमी ऊंचीचे तळघर पूर्वेस किंवा उत्तरेकडे तयार केले जाऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती