वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व दिशेकडे असलेले दुकान फायदेशीर असतात

शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (12:08 IST)
'प्लॉट ची दिशा', 'पूर्व दिशेकडे असलेले दुकान फायदेशीर ठरते, तसेच हे दुकान मालकाची आर्थिक भरभराट घडऊन आणते. 
 
दक्षिण दिशेकडचे दुकान सहसा नाकारावे, कारण त्याने नुकसान किंवा अडचणी पदरात पडू शकतात. दुकानात पिण्याच्या पाण्याची सोय ईशान्येस असावी.  
 
शो-केस ईशान्येस नसावी. ही दक्षिण किंवा पश्चिमेकडे असावी. जर दुकानाचा वापर वर्कशॉप सारखा होत असल्यास अवजड यंत्रांना दक्षिण किंवा नैऋत्य दिशेकडे चालवण्यात यावी.
 
दुकानातील सज्जे किंवा खालची छप्परं दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे असावीत. दुकानात ईशान्य‍ दिशेकडचा कोपरा मोकळा असावा. 
हा कोपरा कोणत्याही प्रकारची सामुग्री साठवण्यासाठी वापरण्यात येऊ नये.
 
ए.सी. उपकरणे दुकानाच्या आग्नेय दिशेस लावावी. सारे फर्नीचर जसा सोफा, पलंग, दीवाण किंवा टेबल दुकानाच्या दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर टेकवून ठेवावे. अशा सार्वजनिक बाजारपेठेत, जिथे सारीच दुकानें दक्षिण दिशेने आहेत, ती अशुभ नसतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती