पक्षी, प्राण्यांमध्ये देखील असते आश्चर्यकारक शक्ती, दूर करतात वास्तू दोष

मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (14:13 IST)
वास्तुशास्त्रात प्राणी आणि पक्ष्यांना मानवी जीवनात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्राणी पक्ष्यांमध्ये नकारात्मक घटकांवर नियंत्रण ठेवण्याची आश्चर्यकारक शक्ती असते असा विश्वास आहे. असे मानले जाते की घरगुती जनावरांमध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याची शक्ती असते.
 
कोणतीही हानी होऊ नये म्हणून गोदान हे सर्वोत्कृष्ट मानले जाते. असेही मानले जाते की ज्या जागेवर घर बांधायचे आहे तेथे पंधरा दिवस गो-वासराला बांधले पाहिजे ज्यामुळे ही जागा पवित्र होते.
 
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेसाठी, गाय पालन सर्वोत्तम मानले जाते. रोज गायीला भाकर दिली पाहिजे. गायीची सेवा केल्याने पितरांना समाधान मिळते. 
 
घरात क्लेश होत असेल तर पक्ष्याला धान्य दिल्यास जीवनात आनंद मिळतो. व्यावसायिकांनी पक्ष्यांना दररोज आहार दिला पाहिजे. याचा आर्थिक बाबतीत फायदा होतो. 
 
गिलहरींना भाकर खाऊ घातल्याने प्रत्येक त्रास सहज सुटतो. घरात पोपट पाळणे देखील शुभ मानले जाते. 
 
माशांना पाळणे आणि त्यांना खाऊ घातल्याने अनेक दोष दूर होतात. असा विश्वास आहे की पाळीव कुत्रा हा घरातील एखाद्या रुग्णाचा आजार स्वत:वर घेऊन घेतो. असेही मानले जाते की गुरुवारी हत्तींना केळी खाऊ घातलेस तर नकारात्मक प्रभाव दूर होतो. आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपल्या घरात गरूड मूर्ती किंवा फोटो ठेवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती