'नंतर' ने 'अंतर' वाढते .....

सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (13:16 IST)
एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका व तसे इतरांना दाखवू पण नका.
 
उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल. 
आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. 
कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. 
निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत, जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.    
 
आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे, 
खूप छान, खूप सुंदर.....
 
आत्ताच दिवस सुरु झाला ... 
आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.
काल सोमवार होता असे वाटत होते ... 
आणि आज शुक्रवार आला सुद्धा.  
 
... महिना संपत आला,
... वर्ष संपायला आले,
...आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही
...आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे ?  
 
चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.
 
आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...
आपल्या आयुष्यात रंग भरुया ... 
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया ...  
हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया ...  
 
उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे
तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका
... हे नंतर करेन
... हे नंतर सांगीन
... यावर नंतर विचार करेन  
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे .....
कारण, आपण हे समजून घेत नाही की
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...  
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
आणि ह्या सगळ्या 'नंतर' नंतर आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की ...  
 
"आणि म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका. 'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.
उदाहरणार्थ ... उत्तम अनुभव, उत्तम मित्रमंडळी, उत्तम कुटुंब "
 
दिवस आजचा ... आणि क्षण आत्ताचा ...  
 
आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस लागलेय.
 
तर बघू या की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोचवत आहे ? कारण...
 
हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही.
 
जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोचावा.
 
सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.

- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती