Travel Tips:प्रवासादरम्यान हॉटेल रूम बुक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

बुधवार, 20 एप्रिल 2022 (15:16 IST)
आपण कुठेतरी प्रवासाला जात असाल किंवा कामानिमित्त सहलीला जात असाल तर पॅकिंगपासून प्रवासापर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी. सहलीला जाण्यापूर्वी, आपण प्रवासासाठी गंतव्यस्थान, मार्ग, रेल्वे, हवाई किंवा रस्त्याचे नियोजन करता. मात्र, अनेकदा हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात लोक निष्काळजी राहतात. 
 
गंतव्यस्थानी पोहोचल्यावरच हॉटेल्स आणि खोल्या शोधणार या विचाराने लोक बेफिकीर होतात. त्याच वेळी, जेव्हा तुम्ही गंतव्यस्थानावर पोहोचता तेव्हा तुम्ही थकलेले असाल किंवा त्या ठिकाणी फिरण्याची घाई असल्यामुळे जास्त तपास न करता  हॉटेल बुक करतात. 
 
अशा स्थितीत हॉटेल बुक करताना आपल्याकडून अनेकदा चुका होतात. हॉटेल बुकिंगकडे दुर्लक्ष केल्याने सहलीची मजा खराब होते. हॉटेलमध्ये राहिल्यानंतर अनेक वेळा आपली फसवणूक झाल्याचे जाणवते. पैसाही जास्त खर्च होतो आणि आराम देखील मिळत नाही.

अशा वेळी हॉटेल बुक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून प्रवासाची मजा खराब होणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या .
 
1 हॉटेलचे ठिकाण -
हॉटेल बुकिंग करताना हॉटेलचे लोकेशन काय आहे हे लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेल सुरक्षित ठिकाणी असले पाहिजे. शांत वातावरणाचा विचार करून निर्जन ठिकाणी हॉटेल्स बुक करू नका. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला फिरायचे आहे, ते हॉटेल जवळच असावे, जेणेकरून वेळेची बचत होईल, हे लक्षात ठेवा.
 
2 अॅपवरून बुकिंग करा- 
हॉटेलची बुकिंग थेट न करता अॅपवरून हॉटेल बुकिंग करा . म्हणजेच, हॉटेलच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग केले पाहिजे, जेणेकरून हॉटेल महागात पडणार नाही. वास्तविक, अनेकदा थेट बुकिंगमध्ये हॉटेल रूमचे दर वाढतात. हे वेळेनुसार होऊ शकते. अनेक हॉटेल्सप्रमाणेच सकाळी खोलीचे दर वाढतात. अनेक वेळा अॅपवरून बुकिंग करताना कूपन कोड किंवाऑफर देखील मिळतात.
 
3 हॉटेलच्या सुविधा-
हॉटेल बुकिंग करण्यापूर्वी तिथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती नक्की घ्या. जसे की रूम किती मोठी आहे, बेड आणि बाथरूम कसे आहेत. कपडे धुण्याची सेवा, रूम मधील  वाय-फाय सुविधा आणि पार्किंगची सुविधा आहे का. याशिवाय हॉटेलमध्ये खाण्यापिण्याची सोय असावी. तसेच, हॉटेलच्या आसपास खाण्याचा पर्याय म्हणून रेस्टॉरंट्स आणि कॅफे असावेत.
 
4 हॉटेलचा रिव्यू वाचा -
 रूम बुक करण्यापूर्वी आणि अंतिम पेमेंट करण्यापूर्वी हॉटेल रिव्यूने नेटवर वाचण्याची खात्री करा. यावरून आपल्याला हॉटेलच्या सेवेची माहिती मिळू शकते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती