माठाची काळजी अशा प्रकारे घ्या-
* आपल्याला असे वाटत आहे का की,माठाचे पाणी नेहमी थंडगार असावे तर माठाला अशा ठिकाणी ठेवा जिथे सावली असेल. जागा हवादार असावी.
* माठाला मातीच्या झाकणाने झाकून ठेवा. या मुळे पाणी देखील झाकलेले राहील आणि थंडगार राहील.
* माठाचे पाणी दररोज बदलावे. जर दररोज बदलणे शक्य नाही तर आठवड्यातून एकदा पाणी आवर्जून बदला. तसेच आठवड्यातून एकदा तरी माठाला स्वच्छ करावे. माठाला स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही रसायनाचे वापर करू नये. तर माठ पाण्यानेच स्वच्छ करावे.