न दमताही घर कसे स्वच्छ ठेवू शकता हे जाणून घ्या

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (23:44 IST)
घर स्वच्छ हवं असं सगळ्यांना वाटत असतं तरी ते नियमाने स्वच्छ करणे अवघड जातं. घाई-गर्दीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले की चिडचिड होते. कित्येक घरांमध्ये एकाध व्यक्तीच घर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो आणि इतर लोकं फक्त पसारा वाढवत असतात. यासाठी स्वत:मध्ये काही बदल करण्याची गरज आहे ज्याने स्वच्छताही राहील आणि सतत कामाचा भारदेखील वाटणार नाही:
 
* पूर्ण घर एकत्र स्वच्छ करू हा नियम कधीच बाळगू नये. याने तुमचं घर कधीचं स्वच्छ दिसणार नाही. पूर्ण घर एकत्र स्वच्छ करण्याचा नादात फारच गोंधळ उडतो आणि थकवाही येतो.
 
* नियोजनबद्ध पद्धतीने काम करायला सुरू करा. एकाच खोलीच्या मागे दिवसभर न लागता, सगळ्या खोलींमध्ये प्राथिमिकतेप्रमाणे स्वच्छता करायला सुरुवात करा.
 
* सर्वात आधी ड्रांइगरूमकडे लक्ष द्या. कोणी आल्यावर सहसा आतल्या खोलीपर्यंत येत नाही. म्हणून बैठक आधी स्वच्छ हवी. तिथे कपडे, बॅग्स, भांडी, खेळणे व इतर सामान ठेवणे टाळा.
 
* ड्रांइगरूममधील सामानाची डस्टिग तर रोजचं करायला हवी. मात्र परदे, पंखे, दारं आणि खिडक्यांना स्वच्छ करण्यासाठी 15 दिवसातून एकदा व्हॅक्युम क्लीनर वापरा किंवा पाण्यात व्हिनेगर घालून खिडकी-दारं पुसले तरी ते चमकायला लागतात.
 
* बैठकीनंतर नंबर येतो किचनचा. किचनच्या टाइल्स इतर रूम्सच्या अपेक्षा जास्त खराब होतात. त्यामुळे अधून-मधून ब्लीचने टाइल्स स्वच्छ करत राहाव्या.
 
* किचनमधील सर्व डबे एकत्र घासायला न काढता रोज एका वेळी तीन-चार डबेच धुवा. म्हणजे पसारा होणार नाही आणि थकवाही येणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती