कार्पेटवर तुटलेल्या काचा सहजपणे दिसून येतं नाही त्यामुळे हाताला किंवा पायाला ते काच टोचून दुखापत होऊ शकते. किती ही स्वच्छ केले तरी कार्पेटचे काच पूर्णपणे स्वच्छ होतच नाही .आज आम्ही सांगत आहोत कार्पेटवरून बारीक पडलेले काचं कसे स्वच्छ करायचे आहे. चला तर मग जाणून घेऊया. या साठी काही साहित्ये लागणार.हे साहित्य वापरण्यापूर्वी कार्पेट ला झाडूने झाडून घ्या .नंतर हे अवलंबवा.
*ब्रेड- ब्रेड ने काच स्वच्छ होईल हे वाचून विचारात पडायला झाले असेल. तर ब्रेड ने बारीक काच सहज निघतात आणि स्वच्छ होतात. या साठी आपल्याला ब्रेड हळुवार त्या कार्पेटवर घासायची आहे.असं केल्याने बारीक काच त्या ब्रेडवर चिटकून जातात. कार्पेट वर ब्रेड घासल्यावर बाहेर जाऊन ब्रेड झटकून द्या आणि पुन्हा ही प्रक्रिया करा जो पर्यंत कार्पेटवरील काच पूर्णपणे स्वच्छ होत नाही.
* वर्तमान पत्र किंवा टिशू पेपर-आपण वर्तमान पत्राने देखील कार्पेटवरील काचेचे तुकडे स्वच्छ करू शकता. या साठी वर्तमानपत्राचे एकाचे दोन भाग करा.नंतर आरामात काचेवर दाबा.असं केल्याने काचेचे तुकडे वर्तमान पत्राला चिटकून जातात. नंतर काच स्वच्छ केल्यावर वर्तमानपत्र कचऱ्याकुंडीत फेकून द्या. अशा प्रकारेच आपण टिशू पेपरने कार्पेटवर पडलेल्या काचेची स्वच्छता करू शकता.